कोंडीचा त्रास आणखी पाच महिने

कोंडीचा त्रास आणखी पाच महिने

पुणे, ता. ९ : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू आहे. आतापर्यंत ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्याचे ‘पीएमआरडीए’चे नियोजन आहे. त्यामुळे नागरिकांना या विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीच्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी आणखी पाच महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो प्रकल्प आणि गणेशखिंड व सेनापती बापट रस्त्यावरून पाषाण, बाणेर आणि औंधकडे सुरळीत वाहतुकीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील चौक परिसरात उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. गणेशखिंड रस्त्यावरील ई स्क्वेअर आणि बाणेर येथे ज्या ठिकाणी पूल उतरणार आहे त्या ठिकाणच्या खांबांचे काम पूर्ण झाले आहे.


मुख्य चौकात उड्डाणपुलाचा खांब असल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यावर पर्याय म्हणून या चौकात एकही खांब न उभारता दोन खांबांमध्ये ५५ मीटर लांबीचे आणि सुमारे १८ ते २० मीटर रुंदीचे लोखंडी गर्डरचे स्पॅन टाकण्याचे काम सुरू आहे. हा दुमजली उड्डाणपूल असल्याने ३२ खांब असून ते उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.
- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, ‘पीएमआरडीए’ आणि मेट्रो प्रकल्प समन्वयक

घटनाक्रम
-१४ जुलै २०२० रोजी अस्तित्वातील उड्डाणपूल पाडला
- मेट्रो प्रकल्प आणि उड्डाणपुलाच्या कामासाठी टाटा कंपनीसमवेत २५ नोव्हेंबर २०२१ रोजी करार
- मेट्रो प्रकल्प ३६ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे बंधन
- परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने ऑक्टोबर २०२३ मध्ये दुमजली पुलाचे काम सुरू
- आतापर्यंत उड्डाणपुलाचे ६५ टक्के काम पूर्ण
- उड्डाणपूल उभारण्यासाठी डिसेंबर २०२४ अखेरची मुदत
- उड्डाणपुलाचा अंदाजित खर्च २५० कोटी रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com