सदनिका विकण्यापूर्वीची रक्कम 
बांधकाम व्यावसायिकाकडून घ्या

सदनिका विकण्यापूर्वीची रक्कम बांधकाम व्यावसायिकाकडून घ्या

Published on

पुणे, ता. ९ ः बांधकाम व्यावसायिकाने पूर्णत्वाचा दाखला घेतल्यानंतर मिळकतकर कर भरत नसल्याने मोठी थकबाकी तयार होत आहे. पण ही रक्कम ग्राहकांना भरायला लावून त्यांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे महापालिकेने ही फसवणूक थांबवून सदनिका ग्राहकांच्या ताब्यात येण्यापूर्वीची रक्कम बांधकाम व्यावसायिकाकडून वसूल करावी, अशी मागणी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी केली आहे.
शहरात दरवर्षी हजारोंच्या संख्येने नवीन सदनिका बांधल्या जात आहेत, त्या विकल्याही जात आहेत. बँकेचे कर्ज घेऊन घराचे हप्ते फेडण्यात अनेक वर्ष जातात. एकीकडे हा कर्जाचा डोंगर असताना दुसरीकडे बांधकाम व्यावसायिकांकडूनही ग्राहकांवर मोठा भुर्दंड लादला जात आहे. महापालिकेकडून पूर्णत्वाचा दाखला घेतल्यानंतर मिळकतकराची आकारणी सुरू होते. जर तोपर्यंत सदनिका विकली गेली नसेल तर ही रक्कम बांधकाम व्यावसायिकाने भरणे आवश्‍यक असते. पण ही रक्कम न भरल्याने त्यावर दंड लागून थकबाकीची रक्कम मोठी होते. ही सदनिका ग्राहकाला विकल्यानंतर थकबाकीची रक्कम ग्राहकांवरच लादली जात असून, त्यांची फसवणूक होत आहे. नागरिकांची ही पिळवणूक थांबविणे आवश्‍यक आहे.
महापालिकेच्या मिळकतकर विभागाने सदनिका ग्राहकाने घेतल्यानंतर त्याच्याकडून मिळकतकर वसूल करावा, त्यापूर्वीची रक्कम बांधकाम व्यावसायिकाकडून वसूल करावी अशी मागणी बालगुडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.