दीपाली मुधोळ -मुंडे 
पीएमपीच्या नव्या अध्यक्ष

दीपाली मुधोळ -मुंडे पीएमपीच्या नव्या अध्यक्ष

Published on

पुणे, ता. ८ : पीएमपीच्या अध्यक्षपदाचा पदभार घेण्यास आशिष येरेकर यांनी नकार दिल्यानंतर शासनाने सोमवारी दीपाली मुधोळ -मुंडे यांची पीएमपीच्या अध्यक्षपदी नियुक्तीचा आदेश काढला आहे. बीडच्या जिल्हाधिकारीपदी त्यांनी काम केले आहे. बीडच्या जिल्हाधिकारीपदावरून त्यांची बदली करण्यात आली. मात्र, नियुक्तीचे ठिकाण न ठरल्याने त्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होत्या. सोमवारी अखेर त्यांची नियुक्ती पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. मात्र त्या पदभार स्वीकारणार का? हेदेखील पाहावे लागणार आहे. यापूर्वी येरेकर यांनी पीएमपीच्या पदासाठी इच्छुक नसल्याने पीएमपीचा पदभार स्वीकारला नव्हता. दीपाली मुधोळ यांच्याबाबतीतही हाच प्रश्‍न निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.