बलात्कार प्रकरणी तरुण अटकेत

बलात्कार प्रकरणी तरुण अटकेत

Published on

पुणे, ता. ९ : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करणाऱ्या एकाला मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. अंकित नंद तिवारी (वय ३८, रा. तपकीर गल्ली, बुधवार पेठ, मूळ रा. बिहार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि आरोपी तिवारी यांची ओळख झाली होती. ओळखीतून त्याने महिलेला जाळ्यात ओढले. महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. महिलेने विवाहाबाबत विचारणा केली तेव्हा तिवारीने तिला धमकावले. विवाहाबाबत विचारणा केल्यास खंडणी मागितल्याची खोटी तक्रार पोलिसांकडे देईल, अशी धमकी तिवारीने दिली. घाबरलेल्या महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक महादेव लिंगे तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.