नेटकऱ्यांनी घेतली वेधशाळेची ‘शाळा’

नेटकऱ्यांनी घेतली वेधशाळेची ‘शाळा’

Published on

ऊन पडल्यानंतर मिम्सचा ‘पाऊस’

ऑरेंज अलर्टनंतर नेटकऱ्यांनी घेतली वेधशाळेची ‘शाळा’

पुणे, ता. ९ : सोमवारी मुंबईसह राज्यात झालेल्या तुफान पावसानंतर हवामान खात्याने मंगळवारीही ऑरेंज अलर्ट दिला होता. पावसाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, पावसाऐवजी आज ऊन पडल्याने नेटकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारचे मिम्स व्हायरल झाल्याचे दिसून येत होते. एकूणच हवामानाच्या इशाऱ्यानंतर नेटकऱ्यांनी वेधशाळेचीच शाळा घेतल्याचे दिसून येत होते.
हवामान खात्याच्या अंदाजाबाबत अनेकदा समाजमाध्यमांवर नेटकरी व्यक्त होत असतात. असाच काहीसा प्रकार मंगळवारी दिसून आला. सोमवारच्या पावसानंतर मंगळवारीही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी सकाळपासून चक्क ऊन पडल्याने हवामान खात्याच्या इशाऱ्यावर नेटकरी मोठ्या प्रमाणावर व्यक्त झाले होते.

व्हायरल झालेले मिम्स...
१) ‘आमच्याकडे आज असं आहे :
आई : का रे शाळेत जायचं नाही का?
मुलगा : मुसळधार पाऊस येणार म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी दिली आहे.
आई : बरं, मग बाहेर उन्हात खेळू नकोस...

२) ऑरेंज अलर्ट म्हणजे कडक ऊन

३) वेधशाळेचीच ‘शाळा’ घेण्याची गरज

४) एकाने तर ऊन पडल्याच्या फोटोसह ‘भयंकर पावसात अडकलोय मित्रांनो,’ अशा पोस्ट शेअर केली आहे.

५) ‘रेड अलर्ट, पुण्यात शाळांना सुट्टी. पाऊस थांबविण्यात हवामान खात्याला यश’

६) ‘आज सुट्टीच आहे, तर मुलांना ‘हवामान खात्याचे महत्त्व’ यावर निबंध लिहायला सांगा
मुले सुरुवात याने करतील : हवामान खाते हे मुलांचा चांगला मित्र आहे. त्यांच्यामुळे पाऊस थांबतो. त्यांनी दिलेल्या अंदाजामुळे जिल्हाधिकारी काका आम्हाला सुट्टी देतात. त्यामुळे आमच्या घरच्यांची झोपपण पूर्ण होते.’

७) ‘मुसळधार ऊन पाडण्यात हवामान खाते यशस्वी, पण एका दिवसाची सुट्टी मिळाल्याने विद्यार्थी हवामान खात्यावर खुश’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.