सुनावणीला पत्नी गैरहजर; पतीला घटस्फोट मंजूर

सुनावणीला पत्नी गैरहजर; पतीला घटस्फोट मंजूर

Published on

पुणे, ता. ९ : पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात केलेल्या दाव्यात पत्नीला समन्स बजावूनही ती आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे न्यायाधीश वि. के. ठाकूर यांनी पतीला एकतर्फी घटस्फोट मंजूर केला आहे.
विजया आणि विजय (नावे बदललेली) यांचा १ मार्च २०१६ ला विवाह झाला. लग्नानंतर विजया दोन महिने चांगल्या नांदल्या. मात्र, त्यानंतर तिने विजय यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. सकाळी उशिरा उठणे, घरातील कामे व स्वयंपाक न करणे, मोठमोठ्याने ओरडून बोलणे, विनाकारण सासरच्यांना त्रास देणे असे प्रकार त्या करू लागल्या. शिवाय विजय यांच्याकडे वेगळे घर घेण्यासाठी व आई-वडिलांपासून विभक्त राहून संसार करण्याचा तगादा लावला. त्यानुसार विजय यांनी वेगळे घर घेतले. पत्नीच्या सततच्या त्रासातून विजय यांना मानसिक आजार सुरू झाला, असे त्यांनी दाव्यात नमूद केले आहे. विजय यांनी अ‍ॅड. शुभांगी जेठीथोर यांच्यामार्फत घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. त्या दाव्यात न्यायालयाने समन्स बजावले व न्यायालयात हजर राहून म्हणणे मांडण्याची संधी विजया यांना दिली. मात्र त्या न्यायालयात हजर झाल्या नाहीत. त्यामुळे घटस्फोटाचा दावा एकतर्फी चालवून न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज नऊ महिन्यांत मंजूर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.