आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Published on

पुणे, ता. ९ : नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) राज्यातील सात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून मंगळवारी (ता. ९) काढण्यात आले. अधिकाऱ्याचे नाव, सध्याचे आणि कंसात नवीन नियुक्तीचे ठिकाण -
डी. टी. शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त- पूर्व, ठाणे शहर (अतिरिक्त आयुक्त मीरा-भाईंदर-वसई-विरार). संजय जाधव, अतिरिक्त आयुक्त प्रशासन ठाणे शहर (अतिरिक्त पोलिस आयुक्त-पूर्व, ठाणे शहर). श्रीकांत पाठक, अतिरिक्त आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार (अतिरिक्त आयुक्त-प्रशासन ठाणे शहर). अभिषेक त्रिमुखे, पोलिस उपमहानिरिक्षक- राज्य राखीव पोलिस बल मुंबई (अतिरिक्त पोलिस आयुक्त, मुंबई). शहाजी उमाप, अतिरिक्त आयुक्त- विशेष शाखा, मुंबई (पोलिस उपमहानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र). शिवाजी राठोड, अतिरिक्त आयुक्त- दक्षिण विभाग नागपूर शहर (अतिरिक्त आयुक्त- विशेष शाखा, मुंबई).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.