कुलसचिव पदाच्या मुलाखतींची चर्चा

कुलसचिव पदाच्या मुलाखतींची चर्चा

Published on

पुणे, ता. १० : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी (ता. १०) पार पडल्या. उर्वरित मुलाखती गुरुवारी (ता. ११) घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे लवकरच विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव मिळणार असून, कोणाची वर्णी लागणार, याबाबत अनेक तर्कवितर्क बांधले जात आहेत.

विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांच्याकडे प्रभारी कुलसचिव पदाचा पदभार सोपविण्यात आला. लोकसभा निवडणूक आचारसंहिता व इतर कारणांमुळे कुलसचिव पदाची निवड प्रक्रिया सुमारे सात महिने रखडली होती. मात्र, आता कुलसचिव पदासाठी अर्ज केलेल्या ३६ उमेदवारांपैकी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन एका उमेदवाराची पूर्णवेळ कुलसचिव म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे व कुलसचिव निवड समितीतील इतर सदस्य या मुलाखती घेणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.