‘ब्लॅक स्पॉट’वर कायमस्वरूपी उपाययोजना करा

‘ब्लॅक स्पॉट’वर कायमस्वरूपी उपाययोजना करा

Published on

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १० : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरातील रस्त्यांवरील अपघात रोखण्यासाठी ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिला.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले. या वेळी पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे योगेश्‍वर डी., पुणे महापालिकेचे वाहतूक नियोजक निखिल मिझार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपअभियंता एम. डी. कजरेकर आदी उपस्थित होते.
दिवसे म्हणाले, अपघात रोखण्यासाठी ब्लॅक स्पॉटवरची उपाययोजना खूप महत्त्वाची आहे. वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांचा डेटा तयार ठेवावा. डेटाच्या आधारे उपाययोजनांनंतर ब्लॅक स्पॉटवर किती अपघात कमी झाले, अपघात कोणत्या वेळी झाले याची माहिती मिळण्यास मदत होईल. आवश्यकता त्या ठिकाणी रस्त्यावर रम्बलर्स बसविणे, सूचना फलक, रोड मार्किंग्ज, झेब्रा क्रॉसिंग, ब्लिंकर्स, रिफ्लेक्टर्स आदी बसविण्याची कार्यवाही करावी. दर तीन महिन्यांनी रोड मार्किंग्ज, रस्त्यावरील परावर्तक, झेब्रा क्रॉसिंग, साइड पट्ट्या रंगविण्यात याव्यात. रस्त्यावरील सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.’’
पुणे जिल्ह्यात ३९ ब्लॅक स्पॉट्स आहेत. त्या ठिकाणी करण्यात आलेल्या दुरुस्तीचा आढावा या वेळी घेण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.