सहायक आयुक्त सुनील तांबे यांची बदली

सहायक आयुक्त सुनील तांबे यांची बदली

Published on

पुणे, ता. १० : कल्याणीनगर अपघात प्रकरण, तसेच अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांचे विशेष शाखेत बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तांबे यांच्या जागी सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.
तांबे यांची गेल्या वर्षी गुन्हे शाखेत सहाय्यक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. ससून रुग्णालयातून अमली पदार्थांची तस्करी करणारा ललित पाटील प्रकरण, गुंड शरद मोहोळ खून प्रकरण, कुरकुंभ अमली पदार्थ तस्करी प्रकरण, बहुचर्चित कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता. पुढील महिन्यात तांबे निवृत्त होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.