उदंड प्रतिसादाने एज्युकेशन एक्स्पो सार्थकी

उदंड प्रतिसादाने एज्युकेशन एक्स्पो सार्थकी

पुणे, ता. ८ : कर्वेनगर येथील डीपी रस्त्यावर सकाळपासूनच विद्यार्थी आणि पालकांची लगबग पाहायला मिळत होती. बारावीनंतरच्या शैक्षणिक संधींसह भविष्यातील करिअरचा मार्ग निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आवर्जून पंडित फार्म्स येथे आयोजित ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’ला गर्दी केली होती. शहरातील नामवंत विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेसह शिक्षणतज्ज्ञांच्या व्याख्यानांची मेजवानी एकाच छताखाली विद्यार्थ्यांनी अनुभवली. रविवारी (ता. ९) एक्स्पोचा शेवटचा दिवस आहे.

प्रदर्शनाच्या सलग दुसऱ्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांनी उदंड प्रतिसाद दिला. दहावी, बारावी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया, वेगाने वाढणाऱ्या करिअर संधी, अभियांत्रिकीचे प्रवेश आदी व्याख्यानांना विद्यार्थ्यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. प्रदर्शनातील स्टॉलला भेट देत प्रवेश कुठे घ्यायला हवा, कोणता अभ्यासक्रम आपल्यासाठी योग्य ठरेल, करिअर नक्की कशात आहे, अशा विविध प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना एक्स्पोमध्ये मिळाली. ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’चे निकमार युनिव्हर्सिटी हे ‘पॉवर्ड बाय स्पॉन्सर’ आहेत तर भारती विद्यापीठ, डीईएस पुणे विद्यापीठ, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे ‘असोसिएट स्पॉन्सर’ आहेत. तसेच मराठवाडा मित्र मंडळ आणि सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी हे ‘को-स्पॉन्सर्स’ आहेत. राज्यातील जवळपास ३५ हुन अधिक नामांकित शिक्षण संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांची माहिती प्रदर्शनात विद्यार्थी-पालकांना घेता येणार आहे.


सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो...
- कधी : रविवारी (ता. ९) शेवटचा दिवस
- केव्हा : सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत
- कोठे : पंडित फार्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर


रविवार (ता.९) चे विशेष व्याख्यान
- सकाळी ११.३० वा.- कौशल्य शिक्षणातील करिअरच्या संधी : सुधाकर शिंदे (कुलसचिव, सिंबायोसिस स्किल्स ॲंड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी)
- सकाळी १२ वा.- दहावीनंतरच्या करिअर संधी : प्रा. भावना नरसिंगगोजू (प्राचार्य, सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालय)
- दुपारी ३.३० वा. - करिअर संधी : प्रश्न विद्यार्थी-पालकांचे आणि उत्तर मार्गदर्शकाचे : प्रा. विजय नवले

‘लकी ड्रॉ’ विजेत्याला ‘टॅब’ :
प्रदर्शनातील व्याख्यानांना उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून टॅब आणि वाईल्डक्राफ्ट बॅग भेट दिली जाणार आहे. रविवारी तीन विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून, भाग्यवंत प्रेक्षक बनण्यासाठी नक्कीच या योजनेचा लाभ घ्या.


मी या प्रदर्शनाला कालपासून भेट देत आहे. विविध विद्यापीठांचे स्टॉल येथे आहेत. त्याचबरोबर तज्ज्ञ लोकांकडून मार्गदर्शन मिळत असल्याने हे प्रदर्शन माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप माहितीपूर्ण आहे.
- स्वरा दीक्षित, विद्यार्थिनी

सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोबद्दल मला काल माहिती मिळाली. म्हणून मी आज पूर्ण दिवस प्रदर्शनाला भेट देत व्याख्यानेही ऐकली. माझ्या पुढील भविष्यासाठी हे प्रदर्शन खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- इशिता गुप्ता, विद्यार्थिनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com