नागनाथ पार रस्ता १५ मीटरचा

नागनाथ पार रस्ता १५ मीटरचा

पुणे, ता. ६ : पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके (खजिना विहीर चौक ते नागनाथ पार) हा रस्ता २४ मिटर रुंद दाखविला आहे. त्यामुळे ऐतिहासिक खुन्या मुरलीधर मंदिर, लक्ष्मी नृसिंह मंदिर बाधित होत आहे. तसेच १२७ मिळकतींच्या जागा ताब्यात घ्यावा लागणार असल्याने मध्यवर्ती भागातील रस्ता २४ ऐवजी १५ मीटर करण्याचा निर्णय शहर सुधारणा समिती आणि मुख्यसभेत घेण्यात आला.

फडके रस्ता हा टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्त्यावरील वाहनचालकांना सोईचा आहे. या रस्त्यावर खजिना विहीर ते नागनाथपार अशी एकेरी वाहतूक होते. हा रस्ता रुंद झाल्यास बाजीराव रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करणे शक्य होणार होते. त्यामुळे २०१७ मध्ये पुणे महापालिकेचा विकास आराखडा अंतिम करताना या रस्त्यावर २४ मीटरचे रुंदीकरण प्रस्तावित केले होते. मात्र, काही स्थानिक नागरिकांनी मे २०१८ मध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या रुंदीकरणास विरोध केला होता. यानंतर राज्य सरकारने महापालिकेकडे यासंदर्भात अभिप्राय मागविला होता. यामध्ये महापालिकेने या रस्त्यावर १७७४ मध्ये बांधलेले व वारसा यादीमध्ये (हेरिटेज) लक्ष्मी नृसिंहाचे मंदिर आहे. रस्ता रुंदीकरण केल्यास या मंदिरासह खुन्या मुरलीधर मंदिरही बाधित होणार आहे. हा रस्ता १५ मिटर रुंद केल्यास केवळ ३२ मिळकती बाधित होणार आहेत. पण २४ मीटरचा रस्ता केल्यास मंदिरासह १२७ मिळकती बाधित होणार आहेत, त्यामुळे हा रस्ता २४ मिटर रुंद न करता १९८७ च्या डीपीनुसार १५ मीटरचा ठेवावा, असा अभिप्राय नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिला होता.
शासनाने हा अभिप्राय मान्य करून यासंदर्भात निर्णय घेण्याचा आदेश महापालिकेला दिला होता. त्यानुसार शहर सुधारणा समिती आणि मुख्यसभेत १५ मीटरच्या रुंदीकरणास मान्यता दिली आहे. यावर आता एमआरटीपी ॲक्ट १९६६ च्या कलम ३७ (१) प्रमाणे पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com