सक्षमता प्रमाणपत्राशिवाय 
एजंट नोंदणी महारेरातर्फे बंद

सक्षमता प्रमाणपत्राशिवाय एजंट नोंदणी महारेरातर्फे बंद

पुणे, ता. ६ : ‘महारेरा’ने २०२३ मध्ये रियल इस्टेट एजंट्ससाठी प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रम बंधनकारक केला होता. महारेराने सुरुवातीला १ सप्टेंबर २०२३ पूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले होते. त्यांनतर ही मुदत वाढवून १ जानेवारी २०२४ केली. ती आता संपली आहे. त्यानंतर महारेराने नवीन एजंट नोंदणी व आधीच्या नोंदणीचे नूतनीकरण बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. तसेच आता ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नसेल त्यांची रेरा नोंदणी निलंबित होऊ शकते, त्यांना प्रवर्तक व विकसकांसोबत काम करण्यासाठी अडचणी होऊ शकतात आणि महारेरातर्फे दंड होण्याचीही शक्यता आहे. हे सर्व टाळायचे असेल व नोंदणीकृत रेरा एजंट व्हायचे असेल तर २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळविणे अत्यावश्यक झाले आहे. या प्रशिक्षणाची पुढील ऑनलाइन व ऑफलाइन बॅच सोमवारपासून (ता. ८) सुरू होत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९१३००७०१३२

अभ्यंग व मसाज
व्यावसायिक कार्यशाळा
पुणे, ता. ६ : आयुर्वेदिक अभ्यंग व मसाज उपचारांनी संधिवात, डोकेदुखी, मानसिक ताणतणाव, उच्च रक्तदाब, हृदय संबंधित आजार, त्वचेचे आजार, पचनासंबंधी तक्रारी दूर होतात व वात-पित्त-कफाचे संतुलन राखले जाते. आरोग्याच्या जागृतीमुळे गेल्या काही वर्षांत या क्षेत्राला लोकप्रियता लाभली आहे. तज्ज्ञ व्यावसायिकांची गरज असणारी ही उपचारपद्धती शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी याबाबत व्यावसायिक दृष्टीतून मार्गदर्शन करणारी तीनदिवसीय कार्यशाळा १९, २० व २१ जानेवारीला आयोजिली आहे. यात अभ्यंग मर्दन संकल्पना, मसाजचे तंत्र, मंत्र व शास्त्र, मसाजचे फायदे, वात-पित्त-कफ प्रवृतीनुसार मसाज, उपयुक्त औषधी तेले, शिरोभ्यंग, पादाभ्यंग, विविध स्ट्रोक्स, स्नेहन, स्वेदन, पावडर मसाज, उदवर्तन, मसाज केव्हा, कधी, किती वेळ करावा व कधी करू नये याबाबत प्रात्यक्षिकासहीत मार्गदर्शन होणार आहे. या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. डॉ. कांत कार्यशाळेत शिकवणार आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क सहा हजार रुपये.
संपर्क : ९१४६०३८०३१, ८९५६३४४४७२
ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, बाणेर रस्ता, गेट क्र. १, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com