बेकरी उत्पादने प्रक्रिया अन् संधी

बेकरी उत्पादने प्रक्रिया अन् संधी

पुणे, ता. ६ : बेकरी पदार्थांची मागणी सर्वपरिचित आहे. इतर व्यवसायांच्या तुलनेत बेकरी व्यवसायासाठी जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. थोड्याशा गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येतो. बेकरी पदार्थांमध्ये नावीन्यपूर्ण स्वादिष्ट व दर्जेदार गुणवत्तेचे पदार्थ एकाच ठिकाणी खायला मिळाले तर हा व्यवसाय आणखी वाढू शकतो. बेकरी उत्पादने, यंत्रे, पायाभूत सुविधा, प्रोजेक्ट प्लॅनिंग, पॅकेजिंग, लेबलिंग, गुंतवणूक इ.विषयी माहिती देणारी दोनदिवसीय विशेष राज्यस्तरीय कार्यशाळा ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे पुण्यात १९ व २० जानेवारीला आयोजिली आहे. दोन दिवसांची कार्यशाळा सशुल्क असून, तिसरा दिवस सर्वांसाठी विनामूल्य असेल.

काय शिकविणार...
दोनदिवसीय कार्यशाळेत बेकरी व्यवसाय ओळख व संधी यांसह ब्रेड व ब्रेडचे सँडविच, मिल्क, पावभाजी पाव, पिझ्झा बेस हे प्रकार, खारी व टोस्ट आणि त्यांचे प्रकार, बिस्कीट व नानकटाई, कोकोनट, चॉकलेट, ड्रायफ्रूट, कराची हे प्रकार, कप केक व त्यामधील चॉकलेट, फ्रूट हे प्रकार, पेस्ट्री व पेस्ट्रीचे ब्लॅक फॉरेस्ट, पायनापल हे प्रकार प्रात्यक्षिकासह शिकायला मिळतील. पहिल्या दोन दिवसांच्या कार्यशाळेला प्रतिव्यक्ती शुल्क चार हजार रुपये आहे.

विनामूल्य कार्यशाळा
तिसऱ्या दिवशी २१ जानेवारीला विनामूल्य कार्यशाळा होणार असून, यात नामवंत बेकरी ब्रॅंडसोबत उद्योजक बनण्याच्या संधींविषयी माहिती तसेच बेकरी उद्योगाला क्षेत्रभेटीचे नियोजन आहे.
तिसऱ्या दिवशीच्या कार्यशाळेत
- बेकरी संलग्न कॅफे फ्रँचायझीच्या मॉडेलची ओळख
- बेकरीची अनोखी उत्पादने, चव चाखण्याची संधी
- फ्रँचायझीद्वारे मिळणारे सहकार्य
- बँकेकडून कर्ज सुविधा
- यशस्वी उद्योजक अनुभव
- सहभागी प्रशिक्षणार्थींना हे मॉडेल घेण्यासाठी विशेष सवलत

नावनोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१, ८९५६३४४४७२ (व्हॉट्सअॅपवर नावनोंदणी उपलब्ध)
ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com