Pune Crime News : शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड गणेश मारणे पोलिसांच्या ताब्यात

शरद मोहोळ खून प्रकरण; नाशिक रस्त्यावरील मोशी टोलनाक्याजवळ गुन्हे शाखेची कारवाई
Sharad Mohol Murder case goon ganesh marne arrested pune police
Sharad Mohol Murder case goon ganesh marne arrested pune policeesakal
Published on

Pune News : शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड गणेश मारणेला पोलिसांनी पुणे-नाशिक रस्त्यावरील मोशी टोलनाक्याजवळ बुधवारी (ता. ३१) रात्री ताब्यात घेतले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Sharad Mohol Murder case goon ganesh marne arrested pune police)

कोथरूड परिसरात पाच जानेवारी रोजी कुख्यात गुंड शरद मोहोळवर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता. याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात टोळीप्रमुख विठ्ठल शेलारसह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी गुन्हे शाखेने १५ आरोपींना अटक केली असून, मारणेसह दोघेजण फरार होते. शेलार याच्यासह १७ जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली.

Sharad Mohol Murder case goon ganesh marne arrested pune police
Pune News : शाळाबाह्य मुलांच्या संख्येबाबत शिक्षण विभाग ‘अनभिज्ञ’! सर्वेक्षणात आढळली तीन हजार २१४ बालके

पोलिस आयुक्त रितेश कुमार, प्रभारी पोलिस सहआयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या सूचनेनुसार खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर,

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलिस हवालदार अस्लम अत्तार, राजेंद्र लांडगे, चंद्रकांत जाधव, दुर्योधन गुरव यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Sharad Mohol Murder case goon ganesh marne arrested pune police
Pune News : शाळाबाह्य मुलांच्या संख्येबाबत शिक्षण विभाग ‘अनभिज्ञ’! सर्वेक्षणात आढळली तीन हजार २१४ बालके

तीन आठवड्यांपासून पोलिस मागावर
गुन्हे शाखेची पथके तीन आठवड्यांपासून गणेश मारणेच्या मागावर होती. मारणे तुळजापूर परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तेथे पोचले. परंतु, तो पुढे कर्नाटक राज्यात गेला. गुन्हे शाखेचे दुसरे पथक कर्नाटकमध्ये गेले.

पोलिसांचे पथक तेथे पोचेपर्यंत तो केरळ राज्यात पसार झाला. तेथून तो ओडिशा राज्यात आणि तेथून पुन्हा नाशिकमध्ये आला. पोलिस तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याचा ठावठिकाणा शोधत होते. पोलिसांनी नाशिक येथून मारणेचा पाठलाग सुरू केला.

तीन ट्रॅव्हल्स बसची तपासणी केली. अखेर मारणेसह त्याच्या साथीदारांसह मोटारीतून जात असताना त्याला मोशी टोलनाक्याजवळ स्पाइन रस्ता परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com