Sharad Pawar
Sharad Pawarsakal

Sharad Pawar : शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व राजमाता जिजाऊंनीच घडवले: शरद पवार

‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तीमत्त्व घडविण्यात फक्त राजमाता जिजाऊंचाच वाटा आहे. अनेक जण वेगवेगळी नावे घेऊन संभ्रम निर्माण करतात.

पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तीमत्त्व घडविण्यात फक्त राजमाता जिजाऊंचाच वाटा आहे. अनेक जण वेगवेगळी नावे घेऊन संभ्रम निर्माण करतात. ३०० वर्ष उलटून गेले तरी आजही जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे केवळ छत्रपती शिवाजी महाराजच आहेत,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

अखिल भारतीय शिव महोत्सव समितीतर्फे एसएसपीएमएस संस्थेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शरद पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रवींद्र धंगेकर, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार मोहन जोशी, चंद्रकांत मोकाटे, विकास पासलकर, प्रशांत धुमाळ, विराज तावरे आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘या देशात अनेक राजे, संस्थानिक होऊन गेले. पण ३०० वर्ष होऊन गेल्यानंतरही सामान्य माणसाच्या अंतःकरणात अधिराज्य करणारे राजे असे देशाच्या कानाकोपऱ्यात विचारले तर केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव येते. एसएसपीएमसच्या या संस्थेच्या आवारात कार्यक्रम सुरू आहे, ही जागा ऐतिहासिक आहे, देशाच्या अनेक लढ्यात महत्त्वाच्या ठिकाणी छत्रपतींचे पुतळे उभे आहेत, पण सर्वाधीक उत्तम पुतळा याठिकाणी आहे.

या देशात राजे, संस्थानिक होऊन गेलेत, पण आपल्याला आठवण छत्रपती शिवाजी महाराजांची होते. देशात अनेकांची राज्य झाली, पण ते यादवांचे राज्य, मोऱ्यांचे राज्य झाले, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला भोसल्यांचे राज्य असा उल्लेख कोणी केला नाही, हे रयतेचे सामान्य जनतेचे राज्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श कार्यपद्धती आखून दिली होती. युद्धावर गेल्यानंतर स्त्रीचा, शेतकऱ्याचा सन्मान केला गेला. त्यामुळेच ३०० वर्षे उलटून गेल्यानंतरही जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत.’’ 

Sharad Pawar
Pune News : हॉटेल, पबवर राहणार पोलिस पथकांचा ‘वॉच’ ; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

या वेळी पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, सागर बाबर यांना शिवनसन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. तर मंगल इटकर-चंद्रशेखर इटकर, शिल्पा बुडूख-अमर बुडूख, रत्नप्रभा जगताप-सुदाम जगताप, डॉ. सुप्रिया वाघ-डॉ. संतोष वाघ, अनुजा पवार-राजेंद्र पवार, जयश्री पतंगे-श्यामराव पतंगे यांना ‘आदर्श माता-पिता पुरस्कार’ प्रदान केला. विकास पासलकर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विराज तावरे यांनी केले.

दिल्लीसमोर झुकणार नाही : सुप्रिया सुळे

खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘आपण कधीही दिल्लीसमोर झुकलो नाही व झुकणारही नाही, ही आपली संस्कृती आहे. सेवा, सन्मान, स्वाभिमान ही तीन वाक्ये घेऊन आपल्याला काम करायचे आहे. एसएसपीएमएस या संस्थेच्या आवारातील शिवाजी महाराज यांचा हा पुतळा देशातील पहिला पुतळा आहे. २०२८ मध्ये या पुतळ्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com