National Science Day
National Science DayeSakal

Science Day : पुणेकरांनो.. असा साजरा करा यंदाचा 'विज्ञान दिन'; विविध संस्थांमध्ये विशेष कार्यक्रम अन् प्रदर्शनांचे आयोजन

Pune Science Day : लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि गृहिणींपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी आयोजित कार्यक्रमांचा आम्ही आढावा घेतला आहे..

पुणे : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बुधवारी (ता. २८) शहरात विविध संस्थांच्या वतीने प्रदर्शने, व्याख्याने आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि गृहिणींपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी आयोजित कार्यक्रमांचा घेतलेला आढावा. तर आजच नियोजन करा तुमच्या विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाचे...

१) आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका) : आयुकातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांविषयी तुम्ही माहिती घेऊ शकता. दिवसभर आयुका संस्थेतील प्रदर्शन तुम्हाला पाहता येईल.
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर
- वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी पाच

२) आघारकर संशोधन संस्था : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, जैवऊर्जा, वनस्पती, बुरशी, लाईकेन, औषधे, जीवाश्म आणि नॅनो तंत्रज्ञानातील नवे संशोधन अभ्यासता येईल. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मुख्य इमारतीत विविध व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले आहे.
- आगरकर रस्ता, डेक्कन परिसर
- वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी पाच

३) भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे) : दिवसभर विविध व्याख्यानांसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विज्ञान प्रदर्शनासह सायन्स क्वीझही आयोजित करण्यात आली आहे. हिवतापाच्या लसीचा शोध, विश्‍वाचे सर्वांत छोटे तुकडे, अरविंद गुप्ता यांच्या खेळण्यांची गंमत, असे विविध कार्यक्रम आयोजिले आहे.
- पाषाण रस्ता
- वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी पाच

४) भारतीय हवामानशास्त्र विभाग : मॉन्सून आणि हवामानाबद्दलच्या विविध प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे.
- शिवाजीनगर, शिमला ऑफीस
- वेळ : सकाळी साडेदहा ते पाच

५) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : विद्यापीठातील विज्ञान शाखेतील विभागांत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण विभागाच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मानवी रक्ताभिसरण संस्थेची दृकश्राव्य चित्रफीत आणि प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.
- वेळ : सकाळी ११ ते दुपारी चारपर्यंत

६) मुक्तांगण विज्ञानशोधिका : विज्ञान प्रात्यक्षिके, विज्ञानाची मनोरंजक कहाणी आणि खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.
- भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता
- वेळ : सकाळी १० ते पाच

७) राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था (एनसीसीएस) : विज्ञान दिनानिमित्त संस्था दिवसभर खुली असणार असून, सकाळी साडेदहा वाजता पर्सिस्टंटचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांचे सकाळी साडेदहा वाजता व्याख्यान होणार आहे.
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवार
- वेळ : सकाळी १० ते पाच

८) राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र (एनसीआरए) : खोडद (नारायणगाव) येथे एनसीआरएचा जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) अर्थात महाकाय रेडिओ दुर्बीण आहे. तेथे दरवर्षी दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येते. विविध शाळा, महाविद्यालयांसह शास्त्रज्ञांचे विज्ञान प्रदर्शन तुम्हाला पाहायला भेटेल.
- खोडद, नारायणगाव
- कधी : बुधवार आणि गुरुवारी
- वेळ : सकाळी साडेनऊ ते पाच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com