पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे

पुणे-नाशिक
हायस्पीड रेल्वेच्या
कामाची ‘गती’ वाढणार
१९६ कोटी निधीस राज्य सरकारची मान्यता

पुणे, ता. १० ः पुणे-नाशिक या दोन शहरांना जवळ आणणाऱ्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीस १९६ कोटी रुपयांचा निधी देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडले असल्याचे मानले जात आहे.


आत्तापर्यंत...
- पुणे-नाशिक या नवीन सेमी हायस्पीड डबल लाइन रेल्वे मार्गाच्या बांधकाम करण्यासाठी आर्थिक सहभाग घेण्याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आठ मार्च २०२१ मध्ये घेतला
- या प्रकल्पासाठी एकूण १६ हजार ३९ कोटी खर्चाच्या अंदाजपत्रकास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली
- या रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी रेल्वे प्रकल्पास निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली
- त्यानुसार राज्य सरकारकडून हा निधी देण्यात आला
- याबाबतचा सरकारी आदेश गृह विभागाचे कार्यासन अधिकारी प्रताप माडकर यांनी काढले
- महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीकडून भूसंपादनासाठी हा निधी मागणीच्या प्रमाणात पुणे जिल्हाधिकारी, अहमदनगर व नाशिक यांना वितरित करण्यात येणार

प्रकल्प का हवा?
- पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात आघाडीवर
- या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प’ उपयुक्त ठरणार
- या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार
- या रेल्वेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार
- या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार
- अवघ्या दोन तासांत हे अंतर कापले जाणार

दुष्टिक्षेपात प्रकल्प
- पुणे नाशिक रेल्वे मार्ग सुमारे २३५ किलोमीटर लांबीचा
- रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार
- रेल्वेचा २०० किलोमीटर प्रति तास वेग
- पुणे-नाशिक अंतर अवघ्या दोन तास
- पुणे-नाशिक दरम्यान सुमारे २४ स्थानकांची आखणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com