कायदा-सुव्यवस्था राखलीच पाहिजे- पवार

कायदा-सुव्यवस्था राखलीच पाहिजे- पवार

पुणे, ता. १० : ‘कसली कोयता गँग, तिचा तर सुपडा साफ करून टाकणार आहे. कायदा- सुव्यवस्था पाळली गेलीच पाहिजे. मग कोणीही आणि कितीही मोठा असो. अजिबात खपून घेतले जाणार नाही.’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील गुन्हेगारांना दम भरला.
वडगाव शेरी येथील विविध विकासकामांचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यानंतर ते बोलत होते. या वेळी आमदार सुनील टिंगरे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे आदी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता घेऊन दहशत माजविण्याचा प्रकार वाढीस लागले आहे. दोन दिवसांपूर्वी विश्रांतवाडी येथे देखील हा प्रकार घडला होता. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार यांनी थेट या कोयता गँगला दम भरला. पवार म्हणाले, ‘‘ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझी सकाळीच पोलिस आयुक्तांबरोबर बैठक झाली. कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा-सुव्यवस्था पाळली गेला पाहिजे. १२-१४ वर्षांची मुले उगीच तलवारी आणि कोयते घेऊन फिरतात. त्यांना आम्हाला जरबच बसवायची आहे. परंतु कायद्याच्या काही अडचणी येत आहेत. करण, त्यांचे वय बसत नाही. त्यामुळे असे काही घडले, तर त्यांच्या आई-वडिलांना बोलाविणार आहे. त्यांची कार्टी काय दिवा लावता,हे कळायला नको का? आपला मुलगा-मुलगी काय करतो, हे पाहण्याची जबाबदारी पालकांची आहे. हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. जाहीरपणे सांगतो, दादा एकादा चूक झाली, पदरात घ्या, असे कुणी म्हटले, तर पदर आता फाटला आहे. पदरात नाही, आता थेट टायरमध्ये घेणार. पुणे शहर हे सुसस्ंकृत आणि विद्येचे माहेरघर आहे. अनेक महापुरुष या शहरात होऊन गेले. त्यांच्या नावाला बट्टा लागेल असे वागू नका.’’

मोदींची गॅरंटी- अजित पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने प्रगती करीत आहे, असे सांगून पवार म्हणाले, ‘‘ विरोधकांना कोणताही मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे सर्व काही गुजरातला चालले आहेत, अशी ओरड करीत आहे. जी गोष्ट महाराष्ट्राची आहे, ती महाराष्ट्राला मिळणारच आहे. विकासकामे गतीने आणि दर्जेदारपणे पूर्ण करणे, याला सर्वोच्च प्राधान्य,असा आग्रह सरकारचा आहे. देशात अशी दर्जेदार कामे करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. म्हणून पंतप्रधान मोदी हे ‘मोदींची गॅरंटी’ आहे, असे म्हणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com