‘सरसंघचालक प्रणाम’ पुस्तकाचे आज प्रकाशन

‘सरसंघचालक प्रणाम’ पुस्तकाचे आज प्रकाशन

पुणे, ता. १० : नू.म.वि. शाळेतील माजी विद्यार्थी संघातर्फे प्रा. सु. ह. जोशी लिखित ‘सरसंघचालक प्रणाम’ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम उद्या (ता. ११) सायंकाळी सहा वाजता स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात होणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे नेते सुनील देवधर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रदीप रावत असणार आहेत. पुस्तकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजपर्यंतच्या सर्व सरसंघचालकांची कारकीर्द, त्यांच्या काळातील आव्हाने, संघावरील बंदीचा काळ, काळानुसार बदललेली कार्यपद्धती आणि सद्य:परिस्थितीत संघाची भूमिका, असे विविध संदर्भ आहेत, अशी माहिती दत्ता चितळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com