अंतरंग नृत्य महोत्सवात
३५० हून अधिक स्पर्धक सहभागी

अंतरंग नृत्य महोत्सवात ३५० हून अधिक स्पर्धक सहभागी

पुणे, ता. २५ : भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने ऑल इंडिया डान्सर्स असोसिएशन आणि अभिभावा आर्ट ॲकॅडमीतर्फे नुकतेच अंतरंग नृत्य महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात अखिल भारतीय नृत्य स्पर्धा झाल्या. या तीन दिवसीय स्पर्धेत विविध राज्यांतून ३५० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. महोत्सवाचे उद्‍घाटन मणिपुरी नृत्यांगना पद्मश्री दर्शनाबेन झवेरी यांच्या उपस्थितीत झाले. मुंबईतील मालाडमध्ये झालेल्या अंतरंग महोत्सवात पुण्याच्या कथ्थक नृत्यांगना अन्वेसा सिंग यांनी एकल कथ्थक नृत्य सादर केले. त्यांना ऑल इंडिया डान्सर्स असोसिएशनचे संचालक डॉ. जी. रथीश बाबू आणि महोत्सवाच्या संचालिका निशा मंगलमपल्ली यांच्या हस्ते नृत्य वैभवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com