स्थानकाच्या बाहेरूनही काढा ‘यूटीएस’ तिकीट

स्थानकाच्या बाहेरूनही काढा ‘यूटीएस’ तिकीट

पुणे, ता. २५ : रेल्वे प्रशासनाने यूटीएस मोबाइल ॲपद्वारे तिकीट बुक करण्यासाठी अंतराच्या निर्बंधात शिथिलता आणली आहे. आता प्रवाशांना स्थानक परिसरातूनही ॲपच्या माध्यमातून जनरल तिकीट काढता येणार आहे. त्यासाठी त्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
रेल्वे प्रशासनाने तिकीट खिडकीवर होत असलेली प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी यूटीएस मोबाइल अॅप सुरू केले. त्याला मुंबई वगळता फारसा चांगला प्रतिसाद लाभला नाही. प्रवाशांना ॲपवरून तिकीट काढण्यासाठी पूर्वी उपनगरीय स्थानकांसाठी पाच किलोमीटरची मर्यादा होती. तर गैर उपनगरीय स्थानकांसाठी तिकीट काढण्यासाठी २० किलोमीटरची मर्यादा होती. प्रवासी संबंधित रेल्वे स्थानकापासून एवढ्या अंतरावर असतील तरच त्यांना यूटीएस तिकीट मिळत असे. मात्र त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने बुधवारपासून अंतराच्या निर्बंधांवर शिथिलता आणली आहे. आता प्रवासी फलाटापासून ३० मीटर अंतरावर असेल तरीदेखील त्यांना तिकीट बुक करता येईल. विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी पकडल्यावर ते या सुविधेचा गैरफायदा घेऊ नये, याकरिता रेल्वे प्रशासनाने स्थानकापासून दूर असतानाच तिकीट बुक करण्याचे निर्बंध घातले होते. बुधवारी ते निर्बंध दूर करण्यात आले.

यूटीएस मोबाइल तिकीट कसे काढाल?
- ‘प्ले स्टोअर’वरून ‘यूटीएस’ ॲप डाऊनलोड करणे.
- ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यात संबंधित व्यक्तींची नावे, मोबाइल क्रमांक, जन्म दिनांक ही माहिती सादर करणे.
- संबंधित मोबाइलवर ओटीपी प्राप्त होईल.
- या नंतर मोबाइल क्रमांकाची नोंदणी होईल.
- यूटीएस ॲप सुरू होईल, तिकीट काढण्यापूर्वी ‘जीपीएस’चा वापर करावा लागेल.
- तिकीटासंदर्भातील माहिती समाविष्ट केल्यावर ऑनलाइन पेमेंटचा पर्याय उपलब्ध होईल.
- ऑनलाइन पेमेंट केल्यावर मोबाइलवर तिकीट उपलब्ध होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com