महिनाभरात २८ गुंड गजाआड

महिनाभरात २८ गुंड गजाआड

पुणे, ता. २५ : शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडणाऱ्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर बेकायदा देशी बनावटीची पिस्तुले बाळगणाऱ्यांवर कारवार्इ करण्याची मोहीम पुणे पोलिसांनी हाती घेतली आहे. यात महिनाभरात २८ गुंडांना अटक करून त्यांच्याकडून ४२ पिस्तूल जप्त करण्यात आली आहे.

हडपसर, नऱ्हे-आंबेगाव, जंगली महाराज रस्ता आणि येरवडा परिसरात गेल्या आठवड्यात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. येरवड्यामधील घटनेत गोळीबारात हॉटेलचालक व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत गोळीबाराच्या २० हून अधिक गुन्ह्यांची नोंद पोलिसांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. त्यानुसार
शहरातील सर्व पोलिस ठाण्यातील तपास पथके आणि गुन्हे शाखेतील पथकांनी २८ गुंडांना अटक करून ४२ पिस्तूल आणि ७४ काडतुसे जप्त केली आहेत, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे व सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

यांच्यावर केली कारवार्इ
सिंहगड रस्त्यावर प्रशांत पवार (वय २८, रा. सिंहगड रस्ता), मेघराज ऊर्फ पप्पू लक्ष्मण दराडे (वय ३२, रा. अहमदनगर), समीर हरिभाऊ हरपुडे यांना बेकायदा देशी बनावटीची पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पाच पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. निखिल राजू शिरसाट (वय २१, रा. धायरी) या तडीपार गुन्हेगाराला पकडण्यात आले. त्याच्याकडून सहा पिस्तूल जप्त केली. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील पवार आणि पथकाने अश्विन बाळकृष्ण लोणारे (वय २०, रा. धायरी) या तडीपार गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून तीन पिस्तूल जप्त केले. या पथकाने वैभव अनंता तरडे (वय २३, रा. धायरी) याच्याकडून तीन पिस्तूल जप्त केली. पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत १४ गुंडांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २८ पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com