‘प्रोजेक्ट जल मूल्य’ची घोषणा

‘प्रोजेक्ट जल मूल्य’ची घोषणा

पुणे, ता. २५ ः पाण्याच्या शाश्वत वापरासाठी त्याचे मूल्य समजणे गरजेचे आहे. यासाठी पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी), सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (गोखले इन्स्टिट्यूट) आणि पुणे नॉलेज क्लस्टर यांच्या सहकार्यातून ‘प्रोजेक्ट जल मूल्य’ सुरू करण्यात आला आहे.
सेनापती बापट रस्त्यावरील ‘एमसीसीआयए’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ‘पीआयसी’मधील सायन्स टेक्नॉलॉजी अँड नॅशनल इनोवेशन इकोसिस्टिम विभागाचे संशोधन प्रमुख दीनानाथ खोलकर, किशोर पंप्सचे सहव्यवस्थापकीय संचालक व ‘पीआयसी’चे सदस्य सिद्धार्थ देसाई, पुणे नॉलेज क्लस्टरमधील सस्टेनेबिलिटी अँड एन्वायरन्मेंट विभागाच्या प्रकल्प व्यवस्थापक डॉ. आश्विनी केसकर सरदेशमुख आणि गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे डॉ. गुरुदास नूलकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एक वर्ष चालणाऱ्या या अभ्यासाचे मुख्य उद्दिष्ट पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पाण्यासंदर्भातील सेवा व किमतीच्या संरचनांचे मूल्यांकन करून अहवाल तयार करणे हे आहे. राहणीमानाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पाणीपुरवठ्याचे महत्त्व अभ्यासातून उलगडण्यात येणार आहे. शहरातील जवळपास सर्वच संशोधन संस्था, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाचा अभ्यासात सहभाग असणार आहे.

कशाचा होणार अभ्यास?
- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पाण्याचा वापर
- दोन्ही शहरात वापरकर्त्यापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी लागणारी किंमत
- पाण्याचा शाश्वत पुनर्वापर आणि मागणी-पुरवठ्याचे व्यवस्थापन
- पाण्याची सोसायटी स्तरावर होणारी गळती
- तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, ५जी तंत्रज्ञानाचा पाणी व्यवस्थापनातील वापर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com