Ravindra Daswadkar
Ravindra Daswadkarsakal

Velhe News : अस्कवडी येथील पुरुष व्यक्तिचा गुंजवणी धरणात आढळला मृतदेह

गुंजवणी धरण (ता.राजगड) बॅक वॉटर मध्ये अस्कवडी येथील पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळला.

वेल्हे - गुंजवणी धरण (ता.राजगड) बॅक वॉटर मध्ये अस्कवडी येथील पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळला असून, याबाबत वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी दिली आहे.

रवींद्र निवृत्ती दसवडकर (वय-४३) सध्या राहणार आंबेगाव पठार, पुणे, मूळ गाव. अस्कवडी, (तालुका राजगड,) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस म्हणाले आज शुक्रवार (ता. २५) रोजी दुपारी एका महिलेने तिचा पती बेपत्ता असल्याची माहिती वेल्हे पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार वेल्हे पोलिसांनी शोध घेतला असता, सदर व्यक्तीची दुचाकी गुंजवणी धरणाच्या बॅक वॉटर परिसरात आढळली.

त्यानुसार परिसरात शोध घेतले असता या ठिकाणी मृत व्यक्तीचे मोबाईल चप्पल व इतर वस्तू आढळल्या या परिसरामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ घुमरे ,विश्वनाथ जाधव, आकाश पाटील यांनी परिसरामध्ये शोध घेतला. परंतु, ही व्यक्ती आढळून न आल्याने प्राथमिक अंदाजानुसार पाण्यात शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीमला या ठिकाणी पाचरण करण्यात आले.

दरम्यान आपत्ती व्यवस्थापन टीमचे तानाजी भोसले, गुलाब भोंडेकर, संदीप सोळसकर, अनिल रेणुसे, मुन्ना विश्वकर्मा, संजय पाटील यांनी या धरणाच्या पाण्यामध्ये शोध घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह आढळला. या मृतदेहास बाहेर काढल्यानंतर वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती वेल्हे पोलीस स्टेशनचे ठाणे आमदार औदुंबर अडवाल यांनी दिली. पुढील तपास वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com