कुलींवरच ‘बॅटरी कार्ट’चा भार

कुलींवरच ‘बॅटरी कार्ट’चा भार

पुणे, ता. २९ ः पुणे स्थानकाच्या फलाटावर गेल्या सहा महिन्यांपासून दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सेवा देणारी बॅटरी ऑपरेटेड कार्ट (बीओएस) पुन्हा सुरू होत आहे. विशेष म्हणजे स्थानकावरील कुलींनी व्यवसायावर परिणाम होत असल्याचे कारण पुढे करीत ही सेवा बंद पाडली होती. आता सेवा पुन्हा सुरू होत असताना रेल्वे प्रशासनाने कुलींच्याच हाती कार्टचे स्टिअरिंग देण्याचे ठरविले आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना मात्र काही शुल्क द्यावे लागणार आहे.

सेवा का पडली होती बंद?
- पुणे स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ
- दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक
- सहा महिन्यांपूर्वी एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी बॅटरी ऑपरेटेड कार्टची सेवा सुरू झाली
- याला सुरुवातीला चांगला प्रतिसाद
- प्रवासी सोबत आणलेले साहित्य याच कार्टमधून घेऊन जात होते
- त्याचा परिणाम कुलींच्या व्यवसायावर होत होता
- त्यामुळे कार्टला विरोध वाढू लागला
- अखेर ही सेवा बंद पडली
- चांगल्या अवस्थेत असलेल्या दोन बॅटरी ऑपरेटेड कार्ट पार्सल जवळच्या जागेत धूळ खात पडून

आताची सेवादेखील सशुल्क
बॅटरी ऑपरेटेड कार्टमध्ये बसून जाण्यासाठी एक प्रवाशाला ५० रुपये आकारण्यात येत होते. आता कुलीकडे याची जबाबदारी देत असतानादेखील या सेवेसाठी प्रवाशांना शुल्क द्यावे लागणार आहे. स्थानकावर सध्या अधिकृत १६२ कुली आहेत. त्यांच्याकडून स्थानकावर २४ तास सेवा दिली जाते. कार्टमधून प्रवाशांच्या साहित्याची वाहतूक करणे हे सोपे आणि कमी खर्चिक होते. पूर्वीच्याच दरात सेवा सुरू झाली तर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दरात जर वाढ झाली तर प्रवाशांसाठी मात्र ते नुकसानदायक ठरणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दराविषयी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांच्या सेवेसाठी बॅटरी ऑपरेटेड कार्टची सेवा स्थानकावर सुरू करीत आहोत. ही सेवा सशुल्क असणार आहे. मात्र अद्याप त्याचे दर ठरलेले नाहीत.
- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com