लखनौ-पुणे विमानात बॉम्ब ठेवल्याचे ट्विट

लखनौ-पुणे विमानात बॉम्ब ठेवल्याचे ट्विट
Published on: 

पुणे, ता. १७ ः लखनौवरून पुण्याला येणाऱ्या इंडिगोच्या ६-इ-११८ विमानात बॉम्ब असल्याच्या ट्विटने एकच खळबळ उडाली. विमान पुणे विमानतळावर उतरताच विमानतळ प्रशासनाने तत्काळ विमानाला ‘आयसोलेशन बे’वर नेले. प्रवाशांना खाली उतरवून प्रवाशांसह संपूर्ण विमानाची सीआयएसएफ व बॉम्ब स्कॉड पथकांकडून तपासणी करण्यात आली. दरम्यान, प्रवाशांना टर्मिनलमध्ये सोडण्यात आले नाही. त्यांना एअर साईडवरच थांबविण्यात आले. विमानाची संपूर्ण तपासणी केल्यावर बॉम्ब आढळून न आल्याने ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले, मात्र यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

लखनौवरून पुण्याच्या दिशेने विमान झेपावल्यानंतर काही मिनिटांतच इंडिगोच्या या विमानात बॉम्ब असल्याचे ट्विट करण्यात आले. याची दखल घेत इंडिगोने पुणे विमानतळ प्रशासनाला याची माहिती दिली. पुणे विमानतळाच्या ‘बॉम्ब थ्रेट असीससमेन्ट कमिटी’च्या सदस्यांनी तत्काळ विमानतळावर धाव घेऊन बॉम्ब शोधण्यासाठी तपासणी सुरू केली.
दरम्यान, ‘सीआयसीएफ’च्या जवानांनी विमानाभोवती सुरक्षेचे कडे तयार केले. बॉम्बची धमकी प्राप्त झाल्यावर नियमाप्रमाणे ज्या-ज्या गोष्टी कराव्या लागतात. ते सर्व सोपस्कार पार पडले. तपासाअंती बॉम्ब नसल्याचे स्पष्ट झाल्यावर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
----------------------
प्रवासी अडकून पडले
लखनौहुन पुण्याला रात्री साडेअकराच्या सुमारास विमान दाखल झाले. विमान उतरण्यापूर्वीच सुरक्षा यंत्रणा सतर्क होत्या. विमान दाखल होताच प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. प्रवाशांना टर्मिनलमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यांना विमानापासून दूर उभे करण्यात आले. त्यानंतर टर्मिनलमध्ये जातानादेखील प्रवाशांची पुन्हा तपासणी करण्यात आली. यात प्रवाशांना सुमारे २ तास थांबून राहावे लागले.
-------------
विमान उडविण्याच्या २० धमक्या
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अनेक धमक्या अथवा अफवा समोर आल्या आहेत. यामुळे विमान कंपन्या व त्या-त्या विमानतळ प्रशासनाची पाचावर धारण बसते. त्यांना पुन्हा तपास करावा लागतो. बॉम्ब शोधणाऱ्या पथकाला पाचारण करावे लागते, विमानतळावरील व्यवस्थापनात बदल करावा लागतो. यात वेळ आणि पैसे खर्च होत आहेत, मात्र यातून काहीच हाती लागत नाही. या धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांत बॉम्बने विमान उडवून देण्याच्या जवळपास २० हून अधिक धमक्या आल्या आहेत, तर १२ विमाने रद्द झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.