International Diabetes Conference
International Diabetes Conferencesakal

International Diabetes Conference : मधुमेहाच्या संशोधनासाठी सांघिक प्रयत्नांची गरज

मधुमेहाच्या संशोधनासाठी वेगवेगळ्या संस्थांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. सांख्यिकी माहिती, वैद्यकीय निष्कर्ष आणि रासायनिक अभिक्रिया यातील तज्ज्ञांच्या सांघिक प्रयत्नातून संशोधन करण्याची गरज असल्याचे मत मधुमेहतज्ज्ञांनी व्यक्त केले.

पुणे : मधुमेहाच्या संशोधनासाठी वेगवेगळ्या संस्थांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. सांख्यिकी माहिती, वैद्यकीय निष्कर्ष आणि रासायनिक अभिक्रिया यातील तज्ज्ञांच्या सांघिक प्रयत्नातून संशोधन करण्याची गरज असल्याचे मत मधुमेहतज्ज्ञांनी व्यक्त केले.

चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटतर्फे आठव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदचे आयोजन करण्यात आले होते. ‘आयसर’चे संचालक प्रा. सुनील भागवत, लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे कमांडंट, लेफ्टनंट जनरल डॉ. नरेंद्र कोतवाल, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष लाल चेलाराम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उन्नीकृष्णन ए. जी., मुख्य वैद्यकीय संचालक ब्रिगेडियर डॉ. अनिल पंडित, चेलाराम समूहाचे उपाध्यक्ष प्रकाश भुपटकर, शोभना चेलाराम उपस्थित होते. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. गुरुराज मुतालिक यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. कोतवाल म्हणाले, ‘‘मधुमेहींची वाढती संख्या आपल्या आरोग्यसेवेपुढील आव्हान आहे. मात्र नवनवीन शोध आणि सहकार्याची संधीदेखील आहे. मधुमेह ही केवळ वैद्यकीय स्थिती नव्हे तर व्यक्ती, कुटुंब आणि समुदायांवर परिणाम करणारे आव्हान आहे.’’

International Diabetes Conference
Uday Samant : महायुतीत अनपेक्षित नेते प्रवेश करणार ; उदय सामंत यांचा पुण्यात दावा

प्रा. भागवत म्हणाले, ‘‘मधुमेही रुग्णांची जोखीम वाढलेली असते. प्रत्येक रुग्णाला समान औषधे देता येऊ शकत नाही. याचाच अर्थ रुग्णाची वैद्यकीय स्थिती आणि कारणे याचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. त्यामुळे डेटा सायन्स, मशिन लर्निंग, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क व तत्सम साधने उपयुक्त ठरू शकतील आणि इथेच डेटा सायंटिस्ट, बायोलॉजिस्ट आणि केमिस्ट हे जिथे एकत्र काम करतात, अशा ‘आयसर’सारख्या संस्थेचा समाजाला उपयोग होऊ शकतो.’’

डॉ. मुतालिक म्हणाले, ‘‘अनेक अत्याधुनिक शोध लागूनही मधुमेहापासून आपल्याला मुक्तता मिळाली नाही. मधुमेह हा केवळ साखर आणि चयापचयाचा आजार नाही, तर त्याहूनही त्याची व्याप्ती खूप खोल आहे. त्याचा जनुकीय माहितीवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे यंत्रणा बिघडते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com