Uday Samant : महायुतीत अनपेक्षित नेते प्रवेश करणार ; उदय सामंत यांचा पुण्यात दावा

महायुतीमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांमध्ये विरोधी पक्षातील अनपेक्षित नेते व पदाधिकारी प्रवेश करतील, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. पुण्यातील शिवसेना भवनात मंगळवारी (ता. १९) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Uday Samant
Uday Samant sakal

पुणे : महायुतीमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांमध्ये विरोधी पक्षातील अनपेक्षित नेते व पदाधिकारी प्रवेश करतील, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. पुण्यातील शिवसेना भवनात मंगळवारी (ता. १९) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे संपर्क नेते संजय मशिलकर, पुणे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे, अजय भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील काँग्रेसच्या प्रिया दत्त शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सामंत यांनी महायुतीमध्ये येत्या आठ दिवसांत विरोधी पक्षातील बडे राजकीय नेते, प्रवेश करतील. पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा दावा केला.

Uday Samant
Madhura Kunjir : मराठमोळ्या कन्येचा लष्करात डंका ; मधुरा कुंजीरची लेफ्टनंटपदाला गवसणी

मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर सामंत यांनी हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद असल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत सामंत म्हणाले, ‘‘अंतर्गत वाद म्हणजे पक्षातील वाद. कोणी गैरसमज करून घेऊ नये. ती घटना दुर्दैवी आहे, असे मी तेव्हाच म्हणालो होतो. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे.’’

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सामंत म्हणाले, ‘‘कोणी नाराज असल्याचे मी कोठे ऐकले नाही. महायुतीमधील आमच्या घटक पक्षांमध्ये पूर्ण समन्वय आहे.’’

‘शिवतारेंबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील’

शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत ‘‘जर-तरच्या प्रश्नांवर बोलण्यात अर्थ नाही. अजून खूप वेळ आहे. अजित पवार यांनी शिवतारे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा त्यांना राग असणे स्वाभाविक आहे. शिवतारे यांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील,’’ असे सामंत यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com