मैत्रिणीच्या कारणावरून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

मैत्रिणीच्या कारणावरून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

मैत्रिणीच्या कारणावरून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
पुणे, ता. २९ : मैत्रिणीवरून झालेल्या वादातून आरोपींनी एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटच्या विटेने मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रास्ता पेठ परिसरात रविवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
या मारहाणीत अभिषेक शंकर गायकर (वय ३०, रा. रेल्वेगेटजवळ, बोपोडी) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सोहेल सलीम मुल्ला (वय २२, रा. एसआरए इमारत, विमाननगर) याच्यासह त्याच्या साक्षीदाराविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात मैत्रिणीच्या कारणावरून वाद झाला. त्यामुळे आरोपींनी अभिषेकला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सिमेंटची वीट डोक्यात घातली. त्यानंतर अभिषेकला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून मुंढवा येथील कुंभारवाडा चौकात नेले. त्याठिकाणी बेल्टने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सोहेल मुल्ला याला ताब्यात घेतले आहे.

सिंहगड रस्त्यावरील बंगल्यातून दागिने चोरी
पुणे, ता. २९ : चोरट्यांनी एका बंगल्यातून सुमारे ४४ लाख रुपये किमतीचे ७८२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरात रविवारी (ता. २८) एप्रिलच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी चंद्रकांत मधुसूदन आठल्ये (वय ६८, रा. संतोष हॉलजवळ, आनंदनगर) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री बंगल्याच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ४४ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com