रुग्णांच्या सभासदत्वाचे 
आपोआप नूतनीकरण

रुग्णांच्या सभासदत्वाचे आपोआप नूतनीकरण

पुणे, ता. ५ ः शहरी गरीब वैद्यकीय साह्य योजनेच्या सभासदत्वाच्या आपोआप नूतनीकरणाची सुविधा महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कर्करोग, डायलिसीसवरील दोन हजारांहून अधिक रुग्णांना सभासदत्व नूतनीकरण करण्यासाठी करावी लागणारी कसरत आता थांबणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या आर्थिक वर्षासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
महापालिकेकडून शहरी गरीब वैद्यकीय साह्य योजनेअंतर्गत रुग्णांना सभासदत्व दिले जाते. त्यानुसार मागील आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत असलेल्या कर्करोग व डायलिसीसच्या रुग्णांना सभासदत्वाचे आपोआप नूतनीकरण करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय आरोग्य विभागाने नुकताच घेतला आहे. त्यामुळे सभासदांना यंदा नव्याने उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज भासणार नाही. सध्या योजनेअंतर्गत कर्करोगाचे १२४७ आणि डायलिसिसचे १०२२ असे एकूण दोन हजार २६९ रुग्ण उपचार घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com