‘सीईटी’ परीक्षांसाठी ११ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

‘सीईटी’ परीक्षांसाठी ११ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

पुणे, ता. ४ : राज्यात अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन अशा विविध १८ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यातून तब्बल ११ लाख ९९ हजार ९१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यात ‘एमएचटी-सीईटी’ अभ्यासक्रमासाठी सात लाख २५ हजार ६४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) उच्च व तंत्रशिक्षण यांसह वैद्यकीय शिक्षण, फाइन आर्ट शिक्षणातील विविध पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ‘सीईटी’ परीक्षा घेण्यात येते. दरवर्षी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी २० ‘सीईटी’ परीक्षा घेण्यात येतात. त्यातील १८ ‘सीईटी’ परीक्षांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या परीक्षांसाठी गेल्या दीड महिन्यांपासून प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आता बीए. बीएस्सी. बी.एड सीईटी, एलएलबी (५ वर्षे) आणि बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम या अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’ परीक्षा वगळता अन्य सर्वच अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’ परीक्षांची ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर पीजीपी-पीजीओ-पीजीएएसएलपी, डीपीएन/पीएचएन या ‘सीईटी’ परीक्षांची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही, अशी माहिती सीईटी सेलतर्फे देण्यात आली आहे.

सीईटी परीक्षा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
एमएचटी-सीईटी ७,२५,६४०
एमबीए/एमएमएस १,५२,९११
एलएलबी (५ वर्षे) ३३,००८
एमसीए ३९,९६५
एलएलबी (३ वर्षे) ८०,१२५
बी.एड. (जनरल, स्पेशल, ईएलसीटी) ७९,०८३
बी.एस्सी नर्सिंग ५३,३१६

२०
एकूण सीईटी परीक्षा

१८
नोंदणी प्रक्रिया सुरू झालेल्या सीईटी परीक्षा

१५
ऑनलाइन नोंदणी पूर्ण झालेल्या सीईटी परीक्षा


नोंदणी प्रक्रिया सुरू असणाऱ्या सीईटी परीक्षा

११,९९,०९१
नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या


राज्यात विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा देण्याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये जागृती वाढत आहे. त्यामुळेच सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी वाढत होत आहे. दरम्यान, सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळाल्यास चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची संधी वाढते. म्हणूनदेखील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश परीक्षा देण्यास इच्छुक आहेत.
- महेंद्र वारभुवन, आयुक्त, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com