रवींद्र धंगेकरांचा मतदारांशी थेट संवाद

रवींद्र धंगेकरांचा मतदारांशी थेट संवाद

पुणे, ता. २९ ः महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी अर्ज भरल्यानंतर पहिल्या १० दिवसांत पुणे शहरात १४ प्रचारयात्रा काढून हजारो मतदारांशी थेट संवाद साधला आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यात प्रचाराचा झंजावात निर्माण केला. कसबा विधानसभेत ३, कोथरूडमध्ये ३, पर्वतीमध्ये ३, वडगावशेरीत ३ तसेच पुणे कँटोन्मेंट व शिवाजीनगरमध्ये प्रत्येकी १ अशा प्रचारयात्रा काढून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढले आहेत.
धंगेकर यांनी पदयात्रांचा प्रारंभ उमेदवारी अर्ज भरल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचे दर्शन घेऊन केला. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रविवारी सकाळी पर्वती विधानसभा मतदारसंघात व सायंकाळी शिवाजीनगर मतदारसंघात पदयात्रा काढण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी या वेळी ढोल ताशांच्या गजरात ‘झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दुकानदारांशी त्यांनी प्राधान्याने संवाद साधला. प्रत्येक ठिकाणी औक्षण, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये श्री गणेशाची आरती करण्यात आली.
या पदयात्रेत ॲड. अभय छाजेड, रमेश सोनकांबळे, संतोष पाटोळे, बंडू नलावडे, भरत सुराणा, स्वप्नील नाईक, प्रथमेश आबनावे, राधिका मखामले, बाळासाहेब ओसवाल, दीपाली ओसवाल, सचिन जोगदंड, अमोल रासकर, शशिकांत पापळ, महेश कदम, शशिकांत तापकीर, मृणाल वाणी, सचिन पासलकर, सचिन अण्णा तावरे, सोनाली उजागरे, विजू पवार, सौरभ माने, तेजस मिसाळ, विद्या कळेकर आदी सहभागी झाले होते.

PNE24U16752

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com