‘आयएसओ’वरील
पुस्तकाचे प्रकाशन

‘आयएसओ’वरील पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, ता. ११ : ‘आयएसओ’ प्रमाणीकरण तज्ज्ञ डॉ. सुरेश दामोदर माळी ऊर्फ सुदामा यांनी लिहिलेल्या ‘आयएसओ ग्लोबल बेनिफिट्स’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. फर्ग्युसन रस्त्यावरील विद्यार्थी साहाय्यक समितीच्या मोडक सभागृहात कलाश्री ग्रुप ऑफ कंपनीचे उद्योजक कृष्णात अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या वेळी यूलिंक ॲग्रीटेक कंपनीचे मुख्य कार्यपालन अधिकारी अश्विनीकुमार रघुवंशी, डॉ. सुरेश माळी यांचे कुटुंबीय, समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी उपस्थित होते. या पुस्तकात आयएसओ प्रक्रिया, इतर ‘ऑडिट्स’ आणि ‘सर्टिफिकेशन्स’चे वर्णन असल्याची माहिती डॉ. माळी यांनी दिली. अडसूळ यांनी ‘आयएसओ’ करताना ‘ऑडिट्स’चे महत्त्व सांगितले. यावेळी ‘आयएसओ’ प्रामाणिकरणाच्या संचालिका शोभा माळी यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्याचा लघुपटही दाखविण्यात आला.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com