const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();
आजपासून करा संतुलित जीवनाचा प्रारंभ

आजपासून करा संतुलित जीवनाचा प्रारंभ

पुणे, ता. १० ः आयुर्वेदिक उपचार, ध्यान, योग, स्वास्थसंगीत आदींसह आपल्या संतुलित जीवनाचा प्रारंभ करण्याची संधी पुणेकरांना शनिवारी (ता. ११) मिळणार आहे. श्रीगुरू बालाजी तांबे यांनी स्थापन केलेल्या कार्ला येथील ‘आत्मसंतुलन व्हिलेज’तर्फे आयोजित कार्यक्रमात विद्वानांच्या मार्गदर्शनातून संतुलित जीवनशैलीची गुरुकिल्ली गवसेल.
‘आत्मसंतुलन व्हिलेज’च्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित आणि ‘संतुलन आयुर्वेद’ प्रस्तुत कार्यक्रम शनिवारी (ता. ११) दिवसभर कर्वेनगर येथील डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे होईल. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता कार्यक्रमाचे उद्‍घाटन होईल. याप्रसंगी त्यांचे व्याख्यानही होईल.
‘आत्मसंतुलन व्हिलेज’मधील विविध उपक्रमांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन या वेळी आयोजित करण्यात आले आहे. ते दिवसभर सर्वांसाठी खुले असेल. ‘संतुलन आयुर्वेद’च्या संचालिका आणि आयुर्वेदाचार्य डॉ. मालविका तांबे यांची दुपारी १२.१५ वाजता आणि सायंकाळी ५ अशी दोन व्याख्याने होतील. दुपारी ३.३० ते सायंकाळी ५ या वेळेत अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे ‘आपली संस्कृती, परंपरा आणि विज्ञान’ या विषयावर व्याख्यान होईल.
सायंकाळी ६.३० वाजता ‘संतुलन आयुर्वेद’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुनील तांबे यांचे ‘ॐकार’ साधनेवरील विशेष सत्र होईल. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांची ‘अनुभूती’ ही संगीत मैफील रंगेल. याच मैफिलीने दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता होईल. संपूर्ण दिवसभर या कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश आहे.
----
कौशिकी यांची आगळीवेगळी मैफील
या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांची ‘अनुभूती’ ही आगळीवेगळी मैफील सजणार आहे. कौशिकी चक्रवर्ती यांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफिली लोकप्रिय असल्या, तरी या मैफिलीत त्या फ्युजन संगीत सादर करणार आहेत. या मैफिलीसाठी विनामूल्य प्रवेश आहे, मात्र त्यासाठी प्रेक्षकांनी ticketkhidakee.com आणि bookmyshow.com या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे.
----
कार्यक्रमाविषयी ः
तारीख - शनिवार, ११ मे २०२४
वेळ - सकाळी १०.३० ते रात्री ९.३०
स्थळ - पंडित फार्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com