तेरा विमानांना उशीर;
प्रवाशांचीही ‘कोंडी’

तेरा विमानांना उशीर; प्रवाशांचीही ‘कोंडी’

पुणे, ता. १० ः पावसामुळे विमान प्रवाशांनाही फटका बसला. पुणे विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या सात व लँडिंग करणाऱ्या सहा अशा एकूण १३ विमानांना सरासरी एक ते दोन तास उशीर झाला. पाटण्याहून पुण्याला येणारे विमान मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. टर्मिनलच्या निर्गमन प्रवेशद्वाराजवळ पाणी साचल्यामुळे प्रवाशांना थोडा वेळ आतच थांबून राहावे लागले. त्यामुळे ‘सिक्युरिटी होल्ड एरिया’त प्रवाशांची बरीच गर्दी झाली होती. जयपूर, दिल्ली, पाटणा, बंगळूर, गोवा आदी ठिकाणी जाणाऱ्या विमानांची उड्डाणे विस्कळित झाली.
सामनासाठी प्रतिक्षा
भुवनेश्वरहून दाखल झालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील प्रवाशांना सामानासाठी बेल्टपाशी सुमारे ५० मिनिटे प्रतिक्षा करावी लागली. पावसामुळे संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सामान विमानातून काढण्यास नकार दिला. त्यामुळे इतर विमानांच्या प्रवाशांनाही वाट बघणे भाग पडले. बेल्टवर आलेले सामान घेऊन टर्मिनलच्या बाहेर पडण्यासाठी प्रवाशांची १० ते १५ मिनिटे वाया गेली. त्यामुळे अनेक प्रवासी संतापले होते.
-------------
टर्मिनलपर्यंत पाणी
जुन्या टर्मिनलच्या ‘निर्गमन’ प्रवेशद्वाराजवळ साचलेले पाणी काढण्याचे काम विमानतळ प्रशासनाकडून सुरु होते. त्यात १० ते १५ मिनिटांचा वेळ लागला. तोपर्यंत प्रवाशांना बाहेरच थांबावे लागले. रस्त्यावरही पाणी साचल्याने प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले होते.
----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com