भाजपमुळे महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात मागे

भाजपमुळे महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात मागे

पुणे, ता. १० ः ‘‘आम्ही राज्यातील खेळाडूंना सोईसुविधा देऊन कायम प्रोत्साहन दिले, मात्र भाजप व प्रशासनाने राज्यातील खेळाडूंना संपवण्याचा घाट घातला आहे. पुण्यात मैदाने असूनही त्यावर नियम व अटी लावून खेळाडूंना खेळण्यापासून वंचित ठेवले जात आहे. मात्र आम्ही यापुढे असे होऊ देणार नाही. क्रीडा क्षेत्राला सोईसुविधा देऊन खेळाडूंना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी खेळाडूंशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी माजी क्रीडामंत्री सुनील केदार, अॅड. वंदना चव्हाण, महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, सुदर्शन जगदाळे, उमेदवार रवींद्र धंगेकर, अंकुश काकडे, अभय छाजेड, अविनाश बागवे, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर यांच्यासह क्रीडा संघटनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘भाजप सरकारने ७० वर्षांवरील व्यक्तींनी खेळाच्या संदर्भात काम करायचे नाही, असा कायदा केला आहे. खेळाडू घडविण्याचे काम त्यांनी थांबविले आहे. प्रशासनही त्याप्रमाणे वागत आहे. पंजाब आणि हरियानात खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा या राज्यातील खेळाडूंना मिळाल्या पाहिजेत. सरकार कुणाचेही येऊ द्या, खेळाडूंना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’’
अॅड. अभय छाजेड यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद शिंदे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com