सिंहगड रस्ता भागात घरफोडी करणारे अटकेत

सिंहगड रस्ता भागात घरफोडी करणारे अटकेत

पुणे, ता. ११ : सिंहगड रस्ता परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ लाख २० हजार रुपये किमतीचे ३० तोळ्यांचे दागिने आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संकेत प्रकाश निवंगुणे (वय २३, रा. बानगुडे चाळ, वारजे माळवाडी), सूरज शिवाजी मरडे (वय २४, रा. शिवसाईनगर, सुतारदरा, कोथरूड), लक्ष्मण अण्णा जाधव (वय ३८, रा. गोसावी वस्ती, हॅप्पी कॉलनी, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. २८ एप्रिल रोजी सिंहगड रस्ता परिसरात घरफोडी झाली होती. या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. घरफोडी करणारे चोरटे वडगाव बुद्रुकमधील तुकाईनगर परिसरात थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना अटक केली. चौकशीत दोघांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. चौकशीत आरोपी निवंगुणे, मरडे यांनी जाधवला दागिन्यांची विक्री केल्याची माहिती दिली. पोलिसांनी जाधवला अटक केली.

सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, हवालदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारू, राजू वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर यांनी ही कामगिरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com