पावसाच्या संगतीने प्रचाराची सांगता

पावसाच्या संगतीने प्रचाराची सांगता

पुणे, ता. ११ ः लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात समावेश असलेल्या पुणे, शिरूर व मावळ या लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी गेल्या एक महिन्यापासून तापलेले प्रचाराचे वातावरण शनिवारी सायंकाळी पावसाच्या हजेरीत शांत झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, रमेश चेन्नीथला, अभिषेक मनु सिंघवी अशा दोन डझनांहून अधिक ‘पॉवरफुल’ नेत्यांच्या प्रचारसभांनी तोफा थंडावल्या. जाहीर सभा, रोड शो, मेळावे, त्यात नेत्यांकडून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनी प्रचाराची सांगता झाली.
खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी, खासदार चंद्रकांत हंडोरे, शिवसेनेचे नेते उदय सामंत, भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर, कॉंग्रेसचे नेते आमदार विश्‍वजित कदम, आमदार सुनील केदार, यशोमती ठाकूर, प्रा. नितीन बानगुडे पाटील, रोहित पवार, अदिती तटकरे, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम अशा विविध पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी प्रचाराच्या सांगता सभा, रॅलीमध्ये भाग घेतला.

केंद्रासह राज्यातील नेत्यांची फौज
चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांसाठी सोमवारी (ता. १३) मतदान होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, रॅली, कोपरा सभा, बैठका घेण्यावर भर दिला. त्यानंतर राज्यातील नेत्यांच्या सभा झाल्या. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभा तिन्ही मतदारसंघांमध्ये झाल्या. त्याद्वारे संबंधित पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यापाठोपाठ मागील आठवडाभर महायुती, महाविकास आघाडीसह अन्य पक्षांचा शहरात जोरदार प्रचार सुरू होता. दरम्यान, सोमवारी मतदान असल्याने शनिवारी प्रचाराचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे केंद्र व राज्यातील वजनदान नेत्यांचे शनिवारी सकाळपासूनच तिन्ही मतदारसंघाकडे पाय वळले. त्यानंतर तिन्ही मतदारसंघामध्ये केंद्र व राज्यातील वजनदार नेत्यांच्या झालेल्या सभांमधील आरोप-प्रत्योरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. अखेर सायंकाळी सहा वाजल्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या.


अशा झाल्या सभा
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मावळमधील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी रोड शो घेतला.
- शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार यांची हडपसरमध्ये सभा
- महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी अजित पवार, आदिती तटकरे यांची सभा
- पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभा झाल्या.
- महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी रमेश चेन्नीथला, अभिषेक मनू सिंघवी, सुनील केदार, यशोमती ठाकूर मैदानात उतरले
- धंगेकर यांच्यासाठी सुप्रिया सुळे, विश्‍वजित कदम, धैर्यशील मोहिते पाटील यांनी रोड शोमध्ये सहभाग घेतला.
- सायंकाळी पावसाची चिन्हे दिसल्याने उमेदवार व पक्षांकडून सभा, रॅली वेळेत पूर्ण करण्यासाठी अक्षरशः धांदल उडाली.
- पावसाने दिलासा दिल्याने सभा, रॅली, बैठका, मतदार, कार्यकर्ते, विविध जातीसमुहांच्या गाठीभेटी झाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com