बोटाची शाई दाखवा,
सर्वोत्तम हॉटेल्समध्ये जेवा

बोटाची शाई दाखवा, सर्वोत्तम हॉटेल्समध्ये जेवा

पुणे, ता. १२ : मतदानाच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (ता. १३) स्विगी डाइन आऊटने मतदारांसाठी एक आकर्षक ऑफर आणली आहे. बोटाला लावलेली शाई दाखवून पुणेकरांना जेवणाच्या बिलात ५० टक्क्यांची सूट मिळेल. एफिंगट बिस्ट्रो, सर्किट हाऊस, द मार्केट, द वेस्टिन, इस्काडा ऑल डे किचन अँड बार, स्काय स्टोरीज अशा अनेक हॉटेल्समध्ये ही ऑफर असणार आहे.
स्विगी डाइन आऊटचे प्रमुख स्वप्नील वाजपेयी म्हणाले, ‘‘मतदान हा फक्त हक्क नाही. ती एक जबाबदारी आहे. नागरिकांनी सक्रिय व्हावं यासाठी शहरातील सर्वोत्तम रेस्टॉरंट आमच्यासोबत आल्याने आम्हाला आनंद झाला आहे. आम्ही पुणेकरांना मतदान करण्याचे आणि त्यानंतर तुमच्या आवडत्या हॉटेलमध्ये तुमच्या आवडत्या पदार्थांवर ताव मारण्याचे आवाहन करत आहोत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com