एखादी संस्था ९० वर्षे पूर्ण करते ही सोपी गोष्ट नाही

एखादी संस्था ९० वर्षे पूर्ण करते ही सोपी गोष्ट नाही

पुणे, ता. १२ : ‘‘एखादी संस्था ९० वर्षे पूर्ण करते ही काही सोपी गोष्ट नाही. यासाठी लागते ते खंबीर नेतृत्व आणि सगळ्यांचा पाठिंबा. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. संस्थेची प्रगती पाहता पुढे भविष्यात ही संस्था मॉडर्न विद्यापीठाकडे वाटचाल करीत असल्याचे वाटते,’’ असे उद्‌गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी काढले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचा ९०वा वर्धापनदिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. गोसावी बोलत होते. कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. श्यामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. सुरेश तोडकर, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. एकबोटे म्हणाले, ‘‘आज ही ९० वर्षाची संस्था ‘प्रोग्रेसिव्ह’ आणि ‘मॉडर्न’ हे दोन शब्द लक्षात ठेऊन शैक्षणिक कार्य करत आहे. पुढील काही वर्षात संस्थेचे समूह विद्यापीठ (क्लस्टर युनिव्हर्सिटी) उभारण्याचा मानस आहे. संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या शाळा-महाविद्यालये शैक्षणिक क्षेत्रात अतिशय मोलाची कामगिरी करत आहेत.’’

या स्नेहमेळाव्यात संस्थेच्या नियामक मंडळाचे सर्व सदस्य, आजीव कार्यकर्ता, संस्था संचलित सर्व शाळा-महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, संचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com