गुंतवणुकीच्या आमिषाने 
डॉक्टरला ३६ लाखांचा गंडा

गुंतवणुकीच्या आमिषाने डॉक्टरला ३६ लाखांचा गंडा

पुणे, ता. १३ ः शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार सातत्याने घडत असून, डॉक्टरांना त्यात टार्गेट केले जात आहे. वारजे भागातील एका डॉक्टराची ३६ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत एका ४६ वर्षीय डॉक्टरने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी डॉक्टराचा वारजे भागातील गणपती माथा परिसरात दवाखाना आहे. त्यांना अनोळखी क्रमांकावरून मोबाईल क्रमांकावर एकाने संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल. ऑनलाइन पद्धतीने शेअर बाजार गुंतवणूक करण्यास चांगली संधी असल्याचे आमिष चोरट्यांनी डॉक्टरांना दाखविले होते. त्यानंतर डॉक्टरांना एक लिंक पाठविण्यात आली. त्यांना समाज माध्यमातील एका समूहात सहभागी करून घेतले. डॉक्टरांसह त्यांचा भाऊ आणि मित्राच्या खात्यातून चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी ३६ लाख ५९ हजार रुपये पाठविण्यात आले. फिर्यादी यांनी परताव्याबाबत विचारणा केली असता, चोरट्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक निळकंठ जगताप अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com