काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे
यांच्या नावावरच आधीच मतदान

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावावरच आधीच मतदान

पुणे, ता. १२ : काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावावर अज्ञात मतदान आधीच केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघड झाली. शिंदे यांनी अखेर मतपत्रिकेवर शिक्का मारून आपला मतदानाचा हक्क बजावला.
या बाबत शिंदे म्हणाले, ‘‘साधू वासवानी चौकातील सेंट मीरा स्कूलमधील मतदान केंद्रावर मी सकाळी ११ वाजता मतदानासाठी गेलो. मतदान केंद्रावर फक्त यादीतील अनुक्रमांक बघून मतदानाची परवानगी दिली जात होती. रांगेत थांबून माझा क्रमांक आल्यानंतर केंद्रात गेलो. त्यावेळी माझ्या नावावर आधीच मतदान झाल्याचे दिसून आले. मी या भागातून महापालिकेची निवडणूक लढलो आहे. वीस वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे. मी काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे. माझ्या नावावर कोणीतरी मतदान करून जात असेल तर हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे. या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. हा सर्व प्रकार उपमुख्य निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी ’१७ बी’चा अर्ज भरून टेंडर व्होट सुविधा उपलब्ध करून त्या अंतर्गत मतदानाचा हक्क बजावण्याची संधी दिली. हे मतदान पारंपारिक पद्धतीने मतदार यादीवरील चिन्हावर शिक्का मारून करण्यात आले. त्यासाठी माझ्या डाव्या हाताचा ठसाही घेण्यात आला.”
‘मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या मतदारांचे नाव, छायाचित्र याची पडताळणी झाली पाहिजे होती. कारण, मतदार यादीत अरविंद तुकाराम शिंदे हे एकच नाव होते. माझ्या नावाच्या वर आणि खाली शिंदे नावाचे कोणताही मतदार नव्हता. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून ही चुक नजरचुकीने झाली असेही म्हणण्यासारखीही परिस्थिती नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
.............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com