चौकटी- पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघ

चौकटी- पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघ

मृतांची नावे यादीत, तर जिवंत मतदार गायब
फरिदा शेख-खान यांच्या कुटुंबातील मृत मतदारांची नावे यादीत होती. तर हयात असलेल्या मतदारांची नावे नव्हती. यात फरिदा यांचेही नाव नव्हते. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही.
सोलापूर बाजार भागातील शंकर वायदंडे यांचे नाव होते, परंतु त्यांच्या पत्नीचे नाव नव्हते. त्यांनी डॉ. आंबेडकर मेमोरिअल टेक्निकल हायस्कूलच्या केंद्रातील अधिकाऱ्याकडे विचारणा केली, परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
---
पतीऐवजी पत्नीचे छायाचित्र
गुलशन लजपतराय खत्री यांच्या मतदारचिठ्ठीतील नावासमोर त्यांच्या पत्नीचे छायाचित्र होते. नावासमोर महिला असा उल्लेख होता. त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत मतदान केले होते. परंतु यावेळी नाव नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
-------
तीन तास वाया गेले
मीनाक्षी सुनील खंडाळे यांनी सांगितले की, ‘‘घरातील कामे उरकून मी मतदानासाठी सकाळी आठ वाजता बाहेर पडले. मला मतदानाची चिठ्ठी मिळालेली नव्हती, पण मुलाला मिळाली होती. भवानी पेठेतील काशेवाडी येथील गोल्डन ज्युबिली इन्स्टिट्यूटमध्ये नाव तपासले असता तेथे आढळले नाही. मग मी जवळच्या हरकानगरमधील महर्षी हरकादास विद्यामंदिरमधील केंद्रावर नाव शोधले. मात्र तिथेही नाव सापडले नाही. यात तीन तास वाया गेले. कामावर जाण्याची घाई असल्यामुळे मतदान करता आले नाही.’’
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com