मतदान प्रक्रिया शांततेत

मतदान प्रक्रिया शांततेत

पुणे, ता. १३ ः पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शहरात आज (ता. १३) शांततेत मतदान पार पाडले. उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा ४ जूनच्या मतमोजणीकडे लागलेल्या आहेत. पुणे लोकसभेअंतर्गत येणाऱ्या कोथरूड, पर्वती, कसबा पेठ या तीन विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत पुणे कँटोन्मेंट, वडगाव शेरी आणि शिवाजीनगर मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी कमी आहे. त्यामुळे याचा फायदा नेमका कोणत्या उमेदवाराला होणार, हे पाहावे लागणार आहे. या सहा विधानसभा मतदारसंघांत सोसायट्या तसेच वस्त्यांमधील मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. तरुण, नोकरदार, कष्टकरी वर्ग, महिला यांनी भरभरून मतदान केले. मात्र अनेकांची नावे मतदार यादीत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजावर संताप व्यक्त केला. तसेच मतदार यादीत फोटो असूनही बोगस मतदान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com