पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन;

रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन; रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, ता. १४ : भाजपकडून मतदारांना पैसे वाटप करीत असल्याचा आरोप करीत सहकारनगर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह ३५ ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता कालावधीत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलिस कर्मचारी अभिजित बालगुडे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत शहरात जमावबंदीचा आदेश लागू आहे. धंगेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवारी (ता. १२) रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत सहकारनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात ठिय्या आंदोलन केले. निवडणूक आचारसंहितेचा भंग करीत बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी करण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून रवींद्र धंगेकर, नितीन कदम, सचिन देडे, अक्षय माने, साकीब आबाजी, संतोष पंडित आणि अनिल सातपुते यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या संदर्भात रवींद्र धंगेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
------
भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे पोलिसांनी आमच्याविरुद्ध एकतर्फी कारवाई केली आहे. या वेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही जमले होते. पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
- नितीन कदम, अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अर्बन सेल

-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com