छत्रपती संभाजी महाराज यांना 
जयंतीनिमित्त अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

पुणे, ता. १४ : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन, अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर, जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, पुणे शहर कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, कैलास वडघुले, मंदार बहिरट, सचिन जोशी, नीलेश इंगवले, निखिल भसमरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मराठा सरदारांचे वंशज सुभाष जेधे, तानाजी शिरोळे, रोहित ढमाले, सतीश शेलार, रोहन पायगुडे आणि विवेक तुपे यावेळी उपस्थित होते. उपस्थितांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील पुस्तकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विराज तावरे, सचिन जोशी आणि प्रशांत धुमाळ यांनी सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com