राज्यातील खाद्यसंस्कृतीचा अनोखा मिलाफ

राज्यातील खाद्यसंस्कृतीचा अनोखा मिलाफ

पुणे, ता. १५ : राज्यातील खाद्यसंस्कृतीचा अनोखा मिलाफ खवय्यांना अनुभवता यावा यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ७ ते ९ जूनदरम्यान ‘सकाळ खाऊगल्ली’चे आयोजन करण्यात आले आहे. ही खाऊगल्ली कर्वेनगरमधील राजाराम पुलाजवळ असलेल्या महालक्ष्मी लॉन्समध्ये भरविण्यात येणार आहे.
‘सकाळ’तर्फे खाऊगल्लीच्या सात यशस्वी पर्वांनंतर आता आठवे पर्व जाहीर करण्यात आले आहे. या खाऊगल्लीच्या निमित्ताने राज्यातील अनेक स्वादिष्ट पदार्थाचा आस्वाद नागरिकांना एकाच छताखाली घेता येणार आहे. तीन दिवसांचा हा कार्यक्रम खाद्यप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे. याशिवाय गेमिंग झोन, लाइव्ह बँडदेखील खास आकर्षण आहे. या खाऊगल्लीला जवळपास २५ हजारांहून अधिक नागरिक भेट देतात. सर्व वयोगटांतील नागरिक यात सहभागी होत असल्याने सेल्फी पॉइंट, लहान मुलांना खेळण्याची स्वतंत्र जागा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम असतील. महाराष्ट्रात दर कोसावर फक्त भाषाच नव्हे, तर खाण्यापिण्याचे पदार्थही बदलतात. असे बदलत असलेले अनेक खाद्यपदार्थ या खाऊगल्लीत असणार आहेत.

व्यवसाय वृद्धीची संधी
‘सकाळ खाऊगल्ली’च्या सातव्या पर्वाला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला होता. यात सहभागी झालेल्या सर्व व्यावसायिकांनाही फायदा झाला. पुणेकरांच्या मागणीवरून ही आगळीवेगळी खाद्यजत्रा पुन्हा एकदा होत आहे. त्यात किचन नॉन किचन स्टॉल आहेत.
स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : ७९७२३ ६७७९६, ७७२२० ०१०९७

हे लक्षात ठेवा
कधी - ७, ८, ९ जून दरम्यान
वेळ - सकाळी ११ ते रात्री १०
कुठे - महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com