कंटेनरखाली येऊन 
दुचाकीस्वाराचा मृत्यू

कंटेनरखाली येऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे, ता. १६ ः कात्रज बायपासकडून देहूकडे जाणाऱ्या रस्त्यावर कंटेनरच्या चाकाखाली येऊन एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. कात्रज चौकात गुरुवारी (ता. १६) सकाळी हा अपघात झाला. संतोष दिलीप तिखट (रा. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी कंटेनर चालक विठ्ठल बाबासाहेब गीते (वय २६, रा. म्हसोबावाडी, ता. आष्टी, बीड) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास संतोष हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. ते कात्रज चौकात गीते चालवत असलेल्या कंटेनरच्या पुढील डाव्या चाकाखाली आले. या अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक पोलिस हवालदार प्रणव सपकाळ यांनी वॉर्डनच्या मदतीने त्यांना बाजूला घेतले. त्यानंतर रिक्षातून भारती हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. भारती विद्यापीठ पोलिसांकडून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com