डिजिटल मार्केटिंग बूट कॅम्प

डिजिटल मार्केटिंग बूट कॅम्प

रिअल इस्टेट एजंटसाठी डिजिटल मार्केटिंगची कौशल्ये शिकवणारा विशेष बूटकॅम्प सोमवारी (ता. २०) सुरू होणार आहे. डिजिटल मार्केटिंगमुळे कमीत कमी गुंतवणुकीत, ठराविक ग्राहक वर्गापर्यंत अचूकपणे पोहोचता येते. रिअल इस्टेट क्षेत्रात तर ‘मार्केटिंग’चे अधिकच महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित तीन दिवसीय ऑनलाइन बूट कॅम्प आयोजित केला आहे. यामध्ये सर्च, डिस्प्ले, रीमार्केटिंग, युट्युब, सोशल मीडिया, लीड जनरेशन, कन्व्हर्जन, पेज लाईक इत्यादी कॅम्पेन कसे चालवावे, लिंक्डडीन, कॅन्व्हा, चॅटजीपीटी यांचा डिजिटल मार्केटिंगमध्ये कसा उपयोग करावा याची माहिती दिली जाणार आहे.
संपर्क : ७३५०००१६०३

व्यावसायिक मसाले कार्यशाळा
घरगुती चवीचे झणझणीत कोल्हापूर स्टाइल मसाले प्रात्यक्षिकासह शिकवणारी कार्यशाळा शनिवारी (ता. १८) व रविवारी (ता. १९) होणार आहे. यात सुमारे दहा प्रकारचे मसाले प्रत्यक्ष तयार करून शिकविले जातील. त्याच्या नोट्स पुरवल्या जातील. यामध्ये पहिल्या दिवशी बिर्याणी, चिकन, मटण, चाट, किचन किंग, मालवणी कोकणी, काळा, कोल्हापुरी कांदा लसूण, मिसळ, गोडा, पेरी पेरी, गरम इत्यादी मासाले प्रात्यक्षिकासह शिकवले जातील. दुसऱ्या दिवशी मसाला व्यवसाय उभे करण्यासाठी लागणारे भांडवल, कच्च्या मालाची खरेदी व उपलब्धता, मसाला व्यवसायाला असणारी मागणी व त्याचे स्वरूप, उपलब्ध असणारी बाजारपेठ, मार्केटिंग करण्याच्या पद्धती, मसाला व्यवसायासाठी लागणारी जागा, प्रोजेक्ट रिपोर्ट, लागणाऱ्या मशिनरी, कॉस्टिंग आदींविषयी माहिती दिली जाईल.
संपर्क : ९१४६०३८०३१

‘एआय’ वापरून बना यूट्यूबर
शिवाजी कचरे यांची उत्तम यूट्यूबर कसे व्हावे व त्यासाठी एआयचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करणारी दोन वीकेंडला चालणारी चार दिवसांची कार्यशाळा शनिवारपासून (ता. १८) सुरू होत आहे. वास्तविक उदाहरणे, प्रात्यक्षिकाद्वारे शिकवण्यावर असलेला भर हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. कार्यशाळेत युट्युबद्वारे कमाई कशी करता येते याबद्दल संपूर्ण माहिती, स्वतःचे चॅनेल कसे तयार करावे, कथा व पटकथा यांचे लेखन कसे करावे, चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी कॅमेरा, ध्वनी, प्रकाशयोजना आणि संकलनाचे तंत्र वापरून चांगली सामग्री कशी तयार करता येईल, कंटेंट निर्मितीमध्ये एआयचा रोल व कंटेंट निर्मितीसाठी कोणती एआय साधने वापरावीत याचे उपयुक्त मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७२

किचन गार्डन ऑनलाइन कार्यशाळा
किचन गार्डनद्वारे भाजीपाला, सक्युलंन्ट्स व कॅक्टस, फोलिएज व फुलझाडे व इतर पिके व झाडे पिकवता येतात. आजकाल सर्वजण आहाराच्या बाबतीत चौकस असल्याने रोजच्या खाण्यात ताजा आणि विषमुक्त भाजीपाला हवासा वाटतो. या पद्धतीने असा भाजीपाला आपण कसा पिकवू शकतो व शोभेची इतर झाडेही घरच्या घरी तयार करू शकतो. याबाबत माहिती देणारी ऑनलाइन कार्यशाळा शनिवारी (ता. १८) होणार आहे. घरातल्या घरात लागवड केलेल्या सेंद्रिय भाज्यांचे आरोग्यदायी फायदे, अन्न सेवनाचे प्रमाण, वैद्यकीय फायदे, आर्थिकदृष्ट्या लागवड कशी करावी, लागवडीसाठी आवश्यक प्रकाश, जागा, पाणी, रोपे, वनस्पती पोषण याविषयी माहिती दिली जाणार आहे.
संपर्क : ९१४६०३८०३१

वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षण सशुल्क असून त्यांचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com